Notices – English

Important notices are uploaded here only on special and important occassions, for the most current notice please refer the parish notice board.

THANK YOU FOR YOUR SUPPORT AND GOD BLESS YOU ALWAYS

समक्ष ख्रिस्तशरीर घेणे शक्य नसेल तर आध्यात्मिक ख्रिस्तशरीर स्विकारू शकता

कोरोना विषाणूच्या भीतीपोटी जनजीवन ठप्प झाले आहे. पुणे धर्मप्रांतातील सर्व सार्वजनिक मिस्सा तशेच धार्मिक सोहळे पुढील सूचना येईपर्यंत स्थगित ठेवल्या आहेत. मिस्सा नसेल तर ख्रिस्तशरीर विधी असणार नाही. येशूने आपले शरीर व रक्त क्रुसावर वाहिले व अंतिम भोजन समयी ख्रिस्तशरीर विधिची प्रतिष्ठापना केली व म्हणाला “ हे माझ्या आठवणी साठी करा”. त्यामुळेच हा विधी आपण प्रत्येक मिस्सावेळी करतो.

मिस्सा रद्द होणे ही कल्पने पलिकडची घटना आहे. कॅथलिक चर्चचे धर्मशिक्षण स्पष्टपणे सांगते की युखॅरिस्ट हे ख्रिस्ती जीवनाचे मूलस्तोत्र व अत्युच्च शिखर आहे. युकॅरिस्ट हे इतर धार्मिक संस्कार व सोहळ्याशी निगडीत व अविभाज्य  अंग आहे. पवित्र युकॅरिस्ट हे चर्च व ख्रिस्ती आध्यात्मिकेचा मूळ गाभा आहे. ख्रिस्त स्व:ता आमचा पास्क आहे. (CCC 1324)

ह्या साक्रामेंता द्वारे आम्ही ख्रिस्ताशी एकरूप होतो. त्याच्या शरीर व रक्तामध्ये आम्ही सहभागी होऊन एकच शरीर बनते (CCC 1331). त्यामुळेच ख्रिस्तशरीर वारंवार स्विकारण्यास चर्च नेहमीच प्रोत्साहन देत आलेली आहे. पण कोरोना विषाणूमुळे आम्ही मिस्साला जाणे शक्य नाही. तरी देखिल आम्ही आध्यात्मिक ख्रिस्तशरीरा द्वारे युकॅरिस्ट मध्ये सहभागी होऊ शकतो.

 भावार्थी मिस्सा मध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकत नसल्यामुळे त्याना क्षमादान मिळण्यास अडचण येते. परंतु जर प्रामाणिक भावनेने, पश्चातापी मनाने क्षमायाचना केली व नंतर पापसंस्कार घेण्याचा निश्चय केला तर आपल्या पापांची क्षमा मिळते इतकेच नाही तर गंभीर पापे सुध्दा माफ केली जातात. (CCC no.1452)

आध्यात्मिक ख्रिस्तशरीरा द्वारे आम्ही ख्रिस्ताप्रती आमची श्रध्दा व विश्वास दर्शवु शकतो. ख्रिस्त युकॅरिस्टमध्ये उपस्थित असुन त्याने  आमच्याशी एकरूप व्हावे म्हणून विनंती करूया. संत अल्फोन्सस दि लिगोरी ह्यानी लिहलेली आध्यात्मिक ख्रिस्तशरीराची प्रार्थना अशी आहे.

हे येशू,

माझा विश्वास आहे की तू Aitपवित्र साक्रामेंत मध्ये

उपस्थित आहेस.

     मी इतर गोष्टीपेक्षा तुझ्यावर जास्त प्रीती करत आहे व माझ्या आत्म्यात तू प्रवेश करावास हीच माझी इच्छा.

     ह्या घटकेला मी तूला साक्रामेंताद्वारे स्विकारू शकत नाही म्हणून आध्यात्माद्वारे माझ्या ह्रदयात ये.

     तू हजर आहेस असे मानून मी तुला आलिंगन देतो आणि तुझ्याशी पूर्णपणे एकरूप होतो.

     तुझ्यापासुन माझी ताटातुट करू नकोस.

     आमेन.

10 things to do 1
10-things-to-do-2
If-you-cant-receive-communion3
10-things-to-do-Marathi
Notices 23Mar
Church Notice Bishop